Ad will apear here
Next
वेंगुर्ले, देवगडातही स्कूबा डायव्हिंग; स्थानिक युवकांना विशेष प्रशिक्षण
स्कूबा डायव्हिंग

डॉ. सारंग कुलकर्णीमालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली, देवबागपाठोपाठ आता वेंगुर्ले आणि देवगडमधील दहा गावांमध्येही स्कूबा डायव्हिंग सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी १६४ जणांना तारकर्ली येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय सागर संशोधक डॉ. सारंग कुलकर्णी यांनी नुकतीच मालवणमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि तारकर्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग अँड अॅक्वेटिक स्पोर्ट (इस्दा) ही संस्था यांच्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या अतिरिक्त पर्यटनस्थळ विकास या प्रकल्पांतर्गत हा कार्यक्रम राबवला जात आहे. तारकर्ली, देवबाग येथे बहरात आलेले जलपर्यटन देवगड आणि वेंगुर्ले तालुक्यातही बहरण्यास या उपक्रमामुळे मदत होणार आहे. स्कूबा डायव्हिंग आणि जलक्रीडा या माध्यमातून ५०० जणांना थेट रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच, चार हजार जणांना अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध झाला असून, आर्थिक उलाढाल शंभर कोटी रुपयांवर पोहोचली आहे. 

स्नॉर्कलिंगदेवगड आणि वेंगुर्ले तालुक्यात पर्यटन अद्याप फारसे वाढलेले नाही. त्यामुळे पर्यटनवाढीसाठीचा पहिला टप्पा म्हणून स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण मोफत देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा खर्च ‘यूएनडीपी’च्या माध्यमातून केला जाणार आहे, तर प्रशिक्षण ‘इस्दा’तर्फे दिले जाणार आहे. स्कूबा डायव्हिंगच्या प्रशिक्षणासाठी देवगड आणि वेंगुर्ले तालुक्यातील  विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्ये, मीठमुंबरी, भोगवे, खवणे, वेंगुर्ले, शिरोडा, रेडी या दहा ठिकाणी चांगली ठिकाणे असल्याचे सर्वेक्षणात दिसून आल आहे. त्यामुळे मालवणप्रमाणेच भविष्यात या ठिकाणांवरही सागरी पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. या माध्यमातून येथील युवकांच्या हाताला काम मिळणार आहे. 

पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण मोफत
या प्रशिक्षणासाठी २२ हजार रुपये खर्च येतो; मात्र पहिल्या टप्प्यात हे प्रशिक्षण मोफत दिले जाणार आहे. यासाठीचे अर्ज संबंधित ग्रामपंचायतींमध्ये उपलब्ध केले जाणार आहेत. त्यातून सात एप्रिल रोजी १६४ प्रशिक्षणार्थींची निवड होईल. नऊ एप्रिलपासून तारकर्ली स्कूबा डायव्हिंग सेंटमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. वेंगुर्ले आणि देवगड तालुक्यातील रहिवासी असलेल्यांनाच हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच, महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

चार प्रकारचे प्रशिक्षण 
या कार्यक्रमांतर्गत स्कूबा डायव्हिंगसाठी पाच दिवस, आतिथ्य व्यवस्थापनासाठी  पाच दिवस, बोट चालवण्यासाठी चार दिवस आणि सागरी विश्वाची ओळख करून देण्यासाठी पाच दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/PYUPBA
Similar Posts
मच्छीमार बांधवांनी स्वयंस्फूर्तीने राबवली सागरतळ स्वच्छता मोहीम मालवण : भारतातील पहिला स्वच्छ जिल्हा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आता समुद्रतळाखालील स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. अशा प्रकारची ही भारतातील पहिली अनोखी स्वच्छता मोहीम आहे. विशेष म्हणजे सरकारच्या मदतीची वाट न पाहता येथील मच्छीमार बांधवांनी ती स्वयंस्फूर्तीने हाती घेतली आहे. तारकर्ली येथील
आता रत्नागिरीतही लुटा स्कूबा डायव्हिंगचा आनंद रत्नागिरी : निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केलेल्या कोकणातील रत्नागिरी हे एक निसर्गरम्य शहर. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना आता निसर्गसौंदर्यासोबतच समुद्रातील सौंदर्यही अगदी जवळून न्याहाळता येणार आहे.
सिंधुदुर्गात फेरफटका – भाग एक ‘करू या देशाटन’ सदरात आजपासून कोकणाची सैर करू या. सुरुवात सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून...
मालवणात प्रवाळांची नवी वसाहत मालवण : संयुक्त राष्ट्र विकास प्रकल्पाच्या (यूएनडीपी) माध्यमातून मालवण समुद्रात कवडा रॉक परिसरात एक अभिनव प्रयोग केला जात आहे. तेथील समुद्रात प्रवाळ प्रत्यारोपण करून प्रवाळाची नवीन वसाहत निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा प्रारंभ नुकताच करण्यात आला. ‘गल्फ ऑफ मन्नार’च्या धर्तीवर ही प्रवाळ बीजप्रत्यारोपणाची प्रक्रिया साकारली जात आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language